

मोरगाव, ता. १७ : सीएनजी भरताना सिगारेट पिण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून मोरगाव (ता. बारामती) येथील श्री मोरया पेट्रोलियमवर कर्मचाऱ्याला मारहाण व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मोटार व कोयता, असा ५ लाख १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोरगाव येथील मोरया पेट्रोलियमवर १४ सप्टेंबर रोजी रात्री ११.४० च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी भरत रंगनाथ मुरूकुटे यांनी आरोपींना सीएनजी भरताना सिगारेट पिऊ नका, असे सांगितले. याचा राग येऊन अभिनव भरत भामे (वय १९), रणजित रवींद्र भामे (वय २६) आणि केदार संजय भामे (वय २१, सर्व रा. मावडी कडेपठार, ता. पुरंदर) यांनी दारूच्या नशेत गोंधळ घालून मारहाण व शिवीगाळ केली.
पोलिसांनी आरोपींच्या बलेनो मोटारीची (क्र. एमएच १२ डब्ल्यूयू २६०८) झडती घेतली असता त्यात विनापरवाना लोखंडी कोयता सापडला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली किसन ताडगे, तुषार जैनक, महादेव साळुंखे, भाऊ चौधरी व निहाल वनवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. पोलिस हवालदार संदीप लोंढे पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.