Pimpri Chinchwad: मोशी कचरा डेपो दुर्घटना; शवविच्छेदनातील प्राथमिक निष्कर्ष समोर, गुदमरून नव्हे तर अतिरक्तस्त्रावामुळे कामगारांचा मृत्यू

PCMC Moshi accident workers post mortem report: शवविच्छेदनातील प्राथमिक निष्कर्षांत कामगारांचा मृत्यू गंभीर मार, मल्टिपल फ्रॅक्चर व अतिरक्तस्रावामुळे झाल्याचे स्पष्ट; गुदमरून मृत्यूची शक्यता कमी, मोशी दुर्घटनेत जबाबदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
Preliminary Autopsy Report Reveals Cause of Death in Moshi Landfill Collapse

Preliminary Autopsy Report Reveals Cause of Death in Moshi Landfill Collapse

sakal

Updated on

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेतील कामगारांचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला. पिंपरीतील यशवंतराव चव्‍हाण स्‍मृती रुग्‍णालयात (वायसीएम) शवविच्छेदन करण्यात आले. गंभीर मार लागल्‍याने, रक्तस्राव व मल्टिपल फ्रॅक्‍चर अशा कारणांनी कामगारांचा मृत्‍यू झाल्‍याचे तज्‍ज्ञांनी सांगितले. श्‍वास गुदमरून मृत्‍यू झाल्याचे प्रथमतः दिसून येत नसल्याचेही त्‍यांनी स्पष्ट केले. डॉक्‍टरांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com