

Pune's Moshi Tragedy: Seven Still Under Debris
Esakal
Pune's Moshi Tragedy: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोतील ढिगारा (डोंगर) मुसळधार पावसामुळे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. दुर्घटनेत ढिगाऱ्याखालून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर ७ ते ८ जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. ढिगारा बाहेर काढण्यात अडथळा येत असल्यानं बचावकार्यात अडचणी येत आहेत. आतापर्यंत १४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. Moshi Dump Collapse Leaves Two Dead, Seven Still Trapped