Pimpri Chinchwad: मोशी दुर्घटनेनंतर मोठी कारवाई! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबनाची नोटीस; आयुक्तांचा दणका

PCMC suspension notice to engineers: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ कामगारांचा बळी; गंभीर निष्काळजीपणावर आयुक्तांचा धडक कारवाईचा बडगा, दोन वरिष्ठ अभियंत्यांना निलंबनाची नोटीस
Major Action After Moshi Garbage Depot Disaster; Two Engineers Face Suspension

Major Action After Moshi Garbage Depot Disaster; Two Engineers Face Suspension

sakal

Updated on

पिंपरी: मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (ता. १३) दोन अधिकाऱ्यांना निलंबनाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामध्ये महापालिका पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचा समावेश आहे. मंगळवारी (ता. १४) सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांना खुलासा मागितला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com