esakal | पुणे विभागातून उत्तरप्रदेश, बिहारसाठी सर्वाधिक रेल्वे गाड्या रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विभागातून उत्तरप्रदेश, बिहारसाठी सर्वाधिक रेल्वे गाड्या रवाना

पुणे विभागातून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी सर्वाधिक रेल्वे गाड्या रवाना झाल्या आहेत.उत्तर प्रदेशसाठी 56 तर, बिहारसाठी 33 रेल्वेगाड्यांमधून एक लाखांहून अधिक स्थलांतरित मजूर त्यांच्या गावी परतले आहेत.

पुणे विभागातून उत्तरप्रदेश, बिहारसाठी सर्वाधिक रेल्वे गाड्या रवाना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे -  लॉकडाऊन कालावधीत पुणे विभागातून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी सर्वाधिक रेल्वे गाड्या रवाना झाल्या आहेत. उत्तर प्रदेशसाठी 56 तर, बिहारसाठी 33 रेल्वेगाड्यांमधून एक लाखांहून अधिक स्थलांतरित मजूर त्यांच्या गावी परतले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे विभागातून आजअखेर 128 रेल्वेमधून 1 लाख 70 हजार प्रवासी रवाना झाले आहेत. या व्यतिरिक्त 6 हजार 769 बसगाड्यांद्वारे 1 लाख 3 हजार 287 व्यक्तींना त्यांच्या राज्यांच्या सीमेवर आणि जिल्ह्यांमध्ये पोचवण्यात आले आहे. तर, विविध भागातून पुणे विभागात 339 बसमधून 7 हजार 80 व्यक्ती आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विभागातून 25 मेपर्यंत रेल्वे परराज्यात सोडण्यात आल्या. यापैकी मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेश 56, उत्तराखंड 2, तमिळनाडू 2, राजस्थानसाठी 5, बिहार 33, हिमाचल प्रदेश 1, झारखंड 6, छत्तीसगड 4, जम्मू-कश्‍मीर 1, मणिपूर 1, आसाम 1 आणि ओडिशासाठी 1 रेल्वे सोडण्यात आली आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. 
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून मंगळवारी (ता. 26) परप्रांतीयांसाठी 12 रेल्वे रवाना होणार आहेत. यामधून 16 हजार 800 व्यक्ती त्यांच्या राज्यात पोचतील. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा