मायलेकींनी दुचाकीवरुन केला कन्याकुमारी ते काश्‍मीरपर्यंतचा प्रवास   

सुवर्णा चव्हाण
बुधवार, 27 जून 2018

पुणे : स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समानता, अवयवदान अशा ज्वलंत विषयांवर जनजागृती करीत दुचाकीवरुन कन्याकुमारी ते जम्मू-काश्‍मीर हा प्रवास करण्याचा पराक्रम पुण्यातील मनाली व मन्वा भिडे या मायलेकींनी केला आहे. या दोघींनी हा चार हजार 25 किलोमीटरचा प्रवास आठ दिवसांत पूर्ण केला आहे. या दोघींनी केलेला हा पराक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी असून, जिद्द मनात ठेवली, तर आपण खूप काही करू शकतो, हे दोघींनी दाखवून दिले आहे. 

गृहिणी असलेल्या मनाली (वय 40) आणि त्यांची मुलगी मन्वा (वय 14) यांनी हा अनोखा व सामाजिक भान जागविणारा प्रवास नुकताच पूर्ण केला. कन्याकुमारीपासून त्यांनी दुचाकीवरून प्रवासाला सुरवात केली. त्यांनी तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाना, पंजाब आणि जम्मू-काश्‍मीर या राज्यांमध्ये प्रवास केला. मुलगी वाचवा, अवयवदान, मानसिक शक्ती कशी वाढवावी, याविषयांवर स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांनी जनजागृती केली. 

या मायलेकी दुचाकीवरून मागील वर्षीपासून ठिकठिकाणी प्रवास करून सामाजिक संदेश देत आहेत. पहिला प्रवास त्यांनी पुणे ते कन्याकुमारी आठ दिवसांत पूर्ण केला होता. त्यानंतर एका दिवसात अष्टविनायक दर्शन आणि आता कन्याकुमारी ते जम्मू-काश्‍मीर असा प्रवास त्यांनी केला आहे. रोज 12 तास त्या दुचाकीवरून प्रवास करत होत्या. मनाली यांच्यासह मन्वा हिनेही प्रवासात उत्साहाने सहभाग घेतला. याविषयी मनाली भिडे म्हणाल्या, ""या प्रवासातून खूप काही शिकता आले. संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळाली. आठवीत शिकणारी माझी मुलगी मन्वा हिने मोलाची साथ दिली. चाकोरीतील आयुष्य जगण्यापेक्षा त्यापलीकडे जाऊन वेगळे काही तरी करावे, यासाठी आम्ही हा प्रवास केला.'' 

कोणत्याही क्षेत्रांत महिला मागे नाहीत, हा संदेश लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही हा प्रवास केला. मी दुचाकी चालवायचे आणि माझी मुलगी मागे बसून मला प्रोत्साहित करायची. या प्रवासात विविध राज्यांतील संस्कृती अनुभवता आली. या प्रवासाची नोंद इंडिया बुक, लिम्का बुक आणि गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. 
- मनाली भिडे 

Web Title: mother and doughter travels from Kanyakumari to Kashmir on a two-wheeler