

Wagholi Murder Case Mother Slits Sons Throat In Pune
Esakal
Mother Slits Sons Throat In Pune: पुण्यातील वाघोलीत आईने ११ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या केलीय. तर १३ वर्षीय मुलीच्या हत्येचाही प्रयत्न केला. पण मुलगी ओरडत बाहेर पळाल्याने ती वाचली आहे. या प्रकरणी हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खोलीत मुलाचा गळा चिरल्यानंतर रक्ताचा सडा पडला होता. तिथं शेजारीच आई सोनी जायभाय ही हात-पाय रक्ताने माखलेल्या अवस्थेत बसून होती.