jawan bapu bhoirsakal
पुणे
Narayangaon News : आई रुग्णालयात, पुत्र देशासाठी रणभूमीकडे रवाना
निगडाळे येथील बापू भोईर आईला उपचारासाठी दाखल करून देश सेवेसाठी झाला रवाना.
नारायणगाव - विषारी सर्पदंश झालेल्या आईला उपचारासाठी नारायणगाव (ता. जुन्नर) येथील जागतिक सर्पदंश व विषबाधा तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांच्या हवाली करून निगडाळे (ता. आंबेगाव) या आदिवासी भागातील श्रीनगर येथे कार्यरत असलेले सीआरपीएफमधील जवान बापू सीताराम भोईर हे देश सेवेसाठी रवाना झाले आहेत.