पुणे - कुटुंबातील एकमेव कमावत्या वडिलांचा आधार हरवलेल्या व पुण्यातील कर्वेनगर येथे राहणाऱ्या संदीप (नाव बदललेले) चे नोव्हेंबर २०१७ मध्ये त्याच्या दोन्ही मूत्रपिंड (किडनी) खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले..छपाईकामाच्या दुकानात कागदपत्रांची जुळणीचे काम करणाऱ्या संदीपला डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण करावे लागेल असे सांगितले गेले. खासगी रुग्णालयात त्यासाठी सांगितलेला १५ लाखांचा खर्च आवाक्याबाहेर होता. मात्र, ससून रुग्णालयात संदीपचे नुकतेच प्रत्यारोपण यशस्वी झाले. त्याच्या आईने त्याला मूत्रपिंड दान करून पुन्हा एकदा नवीन जन्म दिला..संदीप एकमेव कुटुंबातील कमावता असल्याने आर्थिक परिस्थितीपुढे हतबल होऊन प्रत्यारोपण करण्याचा विचार सोडून फक्त डायलिसिस सुरु ठेवले होते. डायलिसिसमुळे काम करणे शक्य नसल्याने जुलै २०२३ पासून काम बंद झाले आणि उत्पन्न पण पूर्णपणे थांबले होते. त्याचवेळेस त्याच्या मित्रमंडळींनी ससूनमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण होत असल्याचे त्याला सांगितले..ससूनचे समाजसेवा अधीक्षक सत्यवान सुरवसे यांनी त्याला नात्यातील व्यक्तींनी मुत्रपिंडदान केले तर प्रत्यारोपण लवकरात लवकर करता येईल. असे सांगून त्याची आई व दोन बहिणींना समुपदेशन केले व त्यासाठी त्या तयारही झाल्या. त्यानुसार मुत्रपिंडविकार तज्ञ डॉ. संदीप मोरखंडिकर यांच्या सल्ल्यानुसार आईचे मूत्रपिंड घेण्याचे निश्चित करण्यात आले.त्यानंतर १५ मे रोजी हे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव व शल्यचिकित्सा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. लता भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली..याकरिता ससूनचे मुत्रविकारतज्ज्ञ डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. विवेक बारेकर, रक्तवहिन्यासंबंधीचे सर्जन डॉ. शार्दूल दाते, डॉ. हृषिकेश पारशी व डॉ. विशाल सावकार, भूलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. सुजित, सिस्टर राजश्री कानडे व त्यांच्या संपूर्ण पथक या सर्वांचा सहभाग होता.ससून मध्ये सर्व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ह्या अत्यंत कमी खर्चात केल्या जातात. याखर्चाकरिता समाजसेवा अधीक्षक तथा अवयव प्रत्यारोपण समन्वयक सत्यवान सुरवसे हे प्रत्येक रुग्णांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी, ओसवाल बंधू समाज पुणे, मुकुल-माधव फाउंडेशन, रंभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, व टाटा ट्रस्ट मुंबई यांच्याद्वारे प्रत्येक रुग्णांना आर्थिक मदत मिळेल यासाठी प्रयत्न करतात..त्यामुळे रुग्णांना स्वतः करावा लागणार खर्च हा अत्यंत कमी येतो. याबाबत सर्व गरीब व गरजू रुग्णांना ससूनचे अधिष्ठाता यांनी आवाहन केले आहे की, ज्यांना ससून मध्ये मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपण करायचे असेल त्यांनी अवयव प्रत्यारोपण समाजसेवा अधिक्षक यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा दर गुरुवारी दुपारी २ ते ४ या वेळेत बाह्यरुग्ण विभागातील क्रमांक ६० येथ मुत्रपिंडविकारतज्ज्ञांना भेटावे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.