

Pune Accident
sakal
पुणे : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील तुळापूर फाटा परिसरात भरधाव पाण्याच्या टँकरच्या धडकेत एका ४७ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दत्तात्रेय मोहन पंडित (रा. उरळी कांचन, ता. हवेली) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.