पालकमंत्र्यांचे नाव डावलल्याने पुण्यात राष्ट्रवादीकडून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात अतिदक्षता विभागाचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न छापल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

कॅन्टोन्मेंट (पुणे) : कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन व भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसने आज बोर्ड कार्यालय परिसरात आंदोलन केले. 15 ऑगस्ट रोजी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात अतिदक्षता विभागाचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न छापल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोर्ड प्रशासन तसेच सत्ताधारी असलेल्या भाजपच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला.

...तर हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करा; उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश​

याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मोरे यांनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदन म्हटले  आहे की, अतिदक्षता विभागाच्या उदघाटन पत्रिकेत तसेच कोनशीलेवर पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव जाणीवपूर्वक डावलले आहे. त्याचा निषेध केला. तसेच पुढील कार्यक्रमापासून पालकमंत्र्याचे नाव डावलल्यास प्रशासनाला न कळविता आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. तसेच कोनशिला बदलून यावर पालकमंत्र्यांचे नाव टाकण्यात यावे अशी मागणी ही करण्यात आली.

मोठी बातमी : पुण्यात कोरोना रुग्णांबाबत नोंदविले गेलेत दोन रेकॉर्ड; वाचा सविस्तर​ 

यावेळी विद्यार्थी कॉग्रेसचे जगदीश कवडे, यश कांबळे, अजय पवार, विकी लोंढे, जितेंद्र राठोड, रेहान बागवान, आदी आंदोलनात सहभागी झाले होते. या संदर्भात बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले,“ पालकमंत्र्यांचा आम्ही आदर करतो, यावेळी बोर्ड प्रशासनाच्या निर्णयानुसार कार्यक्रमपत्रिका करण्यात आली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement by Nationalist Students Congress in Pune