esakal | अरे वा...! बारामतीत रुजतेयं विषमुक्त अन्नाची चळवळ 
sakal

बोलून बातमी शोधा

sunanda pawar.jpg

पोषण मूल्य, आरोग्यदायी परसबाग परिसंवाद व पोषण थाळी स्पर्धा आदी उपक्रमांच्या माध्यमातून वातावण निर्मिती केली जात आहे.

अरे वा...! बारामतीत रुजतेयं विषमुक्त अन्नाची चळवळ 

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव (पुणे) : जिल्ह्यात नैसर्गिक शेतीबरोबर आता विषमुक्त अन्नाची चळवळ रुजू लागली आहे. अर्थात शेतकऱ्यांसह समाजामध्ये या चळवळीला बळकटी देण्याच्या उद्देशाने सुनंदा पवार यांनी सध्या बारामतीत त्रिसूत्री कार्य़क्रम हाती घेतला आहे. पोषण मूल्य, आरोग्यदायी परसबाग परिसंवाद व पोषण थाळी स्पर्धा आदी उपक्रमांच्या माध्यमातून वातावण निर्मिती केली जात आहे. त्याच हेतूने गुरूवार (ता. १७) रोजी बारामती कृषि विज्ञान केंद्रात `पोषण माह– २०२०` अभियानांतर्गत सुमारे शंभर महिलांसाठी आरोग्यदायी परसबाग परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यात अंगणवाडी सेविकांचाही लक्षणिय सहभाग होता. विशेषतः वरील उपक्रम शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषि विज्ञान केंद्र, आयसीएआर (नवी दिल्ली), नारी प्रकल्पांतर्गत शारदा महिला संघ, बारामती पंचायत समिती आणि शारदा कृषि वाहिनी या संस्थांनी पुढाकार घेतला.

अजित पवार पुन्हा कडाडले, 'हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही'

आगामी काळात वरील उपक्रम शेकडो शेतकऱ्यांना जोडून ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार,  गार्गी दत्ता, डॉ. अमृता वाकचौर, प्रा. दिपाली संगेकर, शुभदा भिलारे, डॉ. रतन जाधव, प्रा. यशवंत जगदाळे आदींसह अनेक प्रयोगशिल महिला उपस्थित होत्या. दरम्यान, कृषी विज्ञान केंद्रात आरोग्यदायी परसबाग परिसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने पोषण थाळी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये तज्ज्ञांनी ४ महिलांची उत्कृष्ट थाळीसाठी निवड केली.

बर्थ डे स्पेशल...अमोल कोल्हे यांच्या गनिमीकाव्यापुढे विरोधक हतबल

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाने बारामती येथील मोनाली थोरात यशस्वी झाल्या. त्यांना एक हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून समन्मानित करण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक मळद येथील एकता महिला शेतकरी गटाने पटकावला, तर तृतीय क्रमांक दोन महिलांमध्ये विभागून देण्यात आला. त्यामध्ये नलिनी तनपुरे (माळेगाव ) व बाल विकास योजना (मळद) यांना देण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना इफको कंपनी व कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आरोग्यदायी भाजीपाला रोपे व बियाणे कीट मोफत देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गोडसे यांनी केले, तर आभार सचिन खलाटे यांनी मानले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍपस्वाइन फ्लू, डेंगू, चिकन गुनिया अथवा कोरोना हे आजार नित्त्याचे झाले आहेत. विशेषतः कोरोना आजावर रामबाण औषध अजूनही मिळाले नाही. त्यामुळे प्रशासनाने मनुष्याची प्रतिकारशक्ती वाढविण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. ही शक्ती वाढविण्यासाठी तात्कालीन उपायांबरोबर दिर्घकालीन उपायांवर काम करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून विषमुक्त अन्नाच्या चळवळीला बळकटी येणे खूप महत्त्वाचे आहे.

-सुनंदा पवार, विश्वस्त अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट, बारामती.