श्री तांबडी जोगेश्‍वरीसमोर मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

राज्यातील महाआघाडी सरकारला जागे करण्यासाठी मुळीक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्‍वरी मंदिरासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले. भजन, घंटानाद, शंखनाद कार्यकर्त्यांनी केला. 

पुणे - " श्रद्धावंत भाविकांसाठी देवालयाची दारे उघडी करता येत नसतील, तर झोपी गेलेल्या ढोंगी, भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारने सत्तेतून पायउतार व्हावे,' अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मंगळवारी केली. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील महाआघाडी सरकारला जागे करण्यासाठी मुळीक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्‍वरी मंदिरासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, शहर सरचिटणीस राजेश पांडे, दत्ता खाडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दीपक नागपुरे, संदीप लोणकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर उपस्थित होते. भजन, घंटानाद, शंखनाद कार्यकर्त्यांनी केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुळीक म्हणाले, ""कोरोनामुळे बंद झालेले व्यवहार पूर्ववत होऊ लागले आहेत. परंतु, गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिरांचे दरवाजे उघडायला सरकार तयार नाही. त्यासाठी विविध राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, भाविक सातत्याने मागणी करीत आहेत. परंतु, सरकारला लोकभावना लक्षात येत नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे.'' 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement to open Bharatiya Janata Party temples in Pune