विद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

महापौर जाधव म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना चित्रपटाकडे बघण्याची नवी दृष्टी देण्यासाठी बालदिनानिमित्त बालचित्रपट महोत्सव आयोजिण्यात आला आहे. त्यात दाखविण्यात येणारे चित्रपट मुलांसाठी खास तयार केलेले आहेत. महोत्सवाचा खर्च फोर्ब्ज मार्शल कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) केला जाणार आहे. चित्रपट बघितल्यानंतर मुलांना चित्रपट तज्ज्ञ प्रसन्ना हुलीकवी यांच्याबरोबर गप्पा मारता येणार आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना चिंचवड स्टेशन येथील सायन्स पार्कलाही भेट देता येईल.’’ 

फोर्ब्ज मार्शलच्या मीना जोशी म्हणाल्या, ‘‘बालचित्रपट महोत्सवात चित्रपट पाहण्याबरोबरच विद्यार्थ्यांना कार्यशाळांमध्येही सहभागी होता येणार आहे. त्यात चित्रपटांचे रसग्रहण केले जाणार आहे. महोत्सवात प्रवेश मोफत असून नावनोंदणी आवश्‍यक आहे. त्यासाठी ०२०-३९८५८६०५ या क्रमांकावर किंवा कम्युनिटी सेंटर, गेट नं. ३, फोर्ब्ज मार्शल कंपनी, कासारवाडी येथे सोमवार ते शनिवार या कालावधीत सकाळी ९ ते ४ या वेळेत संपर्क साधावा.’’

महोत्सवाची रूपरेषा
    २३ नोव्हेंबर : सकाळी ८ : चिंचवड येथील कार्निवल सिनेमागृहात उद्‌घाटन. ८.३० : कार्निवल. दुपारी १२.३० : भोसरीतील लांडगे नाट्यगृहात चित्रपट प्रसारण. सकाळी ९ व दुपारी १.३० : सायन्स पार्क येथे लघुचित्रपट प्रसारण व गटचर्चा. सकाळी ११ : फोर्ब्ज मार्शल कंपनीत सिनेमाची कार्यशाळा. 
    २४ नोव्हेंबर : सकाळी ८.३० : कार्निवलमध्ये चित्रपट प्रसारण. सकाळी ९ व दुपारी १.३० : सायन्स पार्कमध्ये गटचर्चा. सकाळी १० व दुपारी २ : ऑटो क्‍लस्टर सभागृहात चित्रपटातील दृश्‍य मिश्रण व कार्यशाळा. 
    २५ नोव्हेंबर : सकाळी ९ व दुपारी १.३० : सायन्स पार्कमध्ये चित्रपट प्रसारण व गटचर्चा. सकाळी १० व दुपारी २ : निगडीतील सिटी प्राइड स्कूलमध्ये चित्रपटातील दृश्‍य मिश्रण व कार्यशाळा.

Web Title: Movie Mahotsav for Student