E-Bus Fire : पुण्यात चालत्या ई-बसला आग; १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

पुण्यातील सेव्हन लव्ह्ज चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित (एसी) बसने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली.
E-Bus Fire

E-Bus Fire

sakal

Updated on: 

स्वारगेट - पुण्यातील सेव्हन लव्ह्ज चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित (एसी) बसने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली. सुदैवाने, या दुर्घटनेत बसमधील सर्व १७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. बस स्वारगेटकडे जात असताना अचानक वाहनातून धूर व ज्वाला दिसू लागल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com