Video : तेव्हा सांगली बंदचे आवाहन केले असते तर बरे झाले असते : खा. कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांची कोणी विनाकारण कुणाशी तुलना करत असतील तर ते दुर्दैवी आहे. भाजपच्या भगवान गोयल यांच्या वादग्रस्त पुस्तकानंतर सांगली बंदचे आवाहन केले असते तर अधिक आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संभाजी भिडे यांनी आज सांगली बंदचे आवाहन केले होते. याबाबत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवद्वितीय होते. साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आपणास आदर आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना होऊ शकत नाही. कोणीही वाद उकरून काढू नये. हा सर्व वाद आता संपलेला आहे.

पुणे : डिएसकेमध्ये गुंतवणुक करणाऱ्या ठेवीदाराची पैसे न मिळाल्याने आत्महत्या

साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे यांच्या वंशावळीबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत कोल्हे म्हणाले, ज्यांनी पुरावे मागितले त्यांनाच तुम्ही हा प्रश्न विचारला तर बरे होईल.

मेट्रो हडपसर ऐवजी लोणी काळभोर पर्यंत नेण्याचा प्रस्ताव
पुणे मेट्रो हडपसरऐवजी शेवाळवाडी आणि लोणी काळभोरपर्यंत नेण्यात यावी. तसेच स्वारगेट ते हडपसर असाही मार्ग सुरू करण्यात यावा असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP amol kolhe critics on Sambhaji Bhide over Sangli Bandh