
कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 61 वा दिवस आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडून देखील अद्याप कोणताही तोडगा निघाला नाहीये.
पुणे : ''शेतकरी आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश असून त्यांना मन की बात ऐकवण्यापेक्षा शेतकऱ्यांची मन की बात ऐकायला हवी'' असा सल्लाच खासदार अमोल कोल्हे यांनी थेट पंतप्रधानांना दिला. पुण्यात पत्रकरांसह बोलताना शेतकरी आंदोलनाविषयी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - Corona Vaccine Update : भारतात 16 लाखाहून अधिक लसीकरण; जगभरात काय अवस्था?
कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 61 वा दिवस आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडून देखील अद्याप कोणताही तोडगा निघाला नाहीये. तर एकीकडे शेतकरी येत्या प्रजासत्ताक दिनाला 'किसान गणतंत्र परेड' अशी ट्रॅक्टर रॅली काढून आपल्या मागण्या पुढे रेटायचा प्रयत्न करण्यासाठी एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करत आहेत. या ट्रॅक्टर परेडला परवानगी नाकारण्यासाठी केंद्र सरकार हरतर्हेचे प्रयत्न करत होते''सरकार परवानगी देवो अगर न देवो, आम्ही ही परेड काढूच'', असा शेतकऱ्यांचा निर्धार होता. मात्र, सरतेशेवटी दिल्ली पोलिसांना या परेडसाठी परवानगी द्यावी लागली आहे.
- पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे
दरम्यान याबाबत बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, ''तब्बल दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्राने जी असहिष्णुता दाखवली ती निषेधार्ह आहे, अशा शब्दात यांनी केंद्र सरकारवर टीका केली.