ड्रग्ज सापडण्याआधी गुजरातच्या 'त्या' बंदराचं नाव वेगळं - कोल्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr Amol Kolhe

ड्रग्ज सापडण्याआधी गुजरातच्या 'त्या' बंदराचं नाव वेगळं - कोल्हे

मागील महिन्यात गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर 3 हजार किलोंचा ड्रग्जसाठा पकडण्यात आला होता. हे बंदर अदानी समुहाचं आहे. मात्र, ड्रग्ज सापडल्यानंतर त्या बंदराला सर्वजण मुंद्रा पोर्ट म्हणू लागले, हे का होतं, असा सवाल कोल्हेंनी उपस्थित केला आहे. 'साम' चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मानसिक स्वास्थ, मेडिटेशन, बिघडलेली सामाजिक व्यवस्था आणि काही महत्वाच्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं.

अमरावतीत झालेल्या हिंसाचारावर बोलताना, अशाप्रकारच्या घटनांना ध्रुवीकरणाचं खतपाणी असल्याचं मत अमोल कोल्हेंनी मांडलं. एखादी घटना बांगलादेशात घडते. त्या घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया त्रिपुरात उमटते. आणि त्रिपुरातून सोशल मीडियामार्फत आलेल्या माहितीच्या आधारे अमरावतीतील लोकं रस्त्यावर उतरतात. तरुणांच्या हाती दगड दिले जातात, असे ते म्हणाले.

अल्पकालीन स्वार्थासाठी दीर्घकालीन नुकसान होतंय का, याचा विचार राजकारण्यांनी करायला हवा. कारण या गोष्टींच्या बाबतीत लोक केंद्राकडे बोट दाखवत असले तरीही, ध्रुवीकरणामुळे या घटना घडत असल्याचं त्यांनी म्हटलं. यासाठी त्यांनी कंगना रणौतच्या वक्तव्याचा उल्लेख केला.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काही काळ एकांतवासात जात असल्याचं ट्वीट केलं. यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. काहींनी कोल्हेंचा राजकीय संन्यास असल्याचं म्हटलं. तर काहींनी आणखी वेगळे तर्क लावले.

यानंतर अमोर कोल्हेंनीच सोशल मीडियावर येत एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यांनी मानसिक आरोग्य आणि स्वास्थाबद्दल काही महत्वाचे मुद्दे मांडले. दररोजच्या धाकधुकीच्या जीवनात माणूस मानसिक आरोग्याकडे लक्ष्य देण्याचं विसरतो. त्यातून पुरुष म्हटलं की, मोकळं होण्यासाठी किंवा रडण्यासाठी सुद्धा वेगळे मार्ग शोधावे लागतात, असं कोल्हेंनी म्हटलं होतं.

आठ दिवसांच्या ब्रेकनंतर अमोल कोल्हेंनी त्यांचा अनुभव शेअर केला. अंतर्मुख होण्यासाठी याचा उपयोग झाल्याचं त्यांनी सांगितलं.

loading image
go to top