Vidhan Sabha 2019 : पर्वतीमध्ये भाकरी फिरविण्याची हीच योग्य वेळ : खासदार डॉ. अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

Vidhan Sabha 2019 : सहकारनगर : भाजपची देशात आणि महाराष्ट्रात सत्ता आहे. पुणे महानगरपालिकेत सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता असून पर्वती मतदारसंघात विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दहा वर्षात काय विकास केला ? हे जर सांगता येत नसेल तर पर्वती मतदारसंघात भाकरी फिरविण्याची हीच खरी योग्य वेळ आहे असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

Vidhan Sabha 2019 : सहकारनगर : भाजपची देशात आणि महाराष्ट्रात सत्ता आहे. पुणे महानगरपालिकेत सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता असून पर्वती मतदारसंघात विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दहा वर्षात काय विकास केला ? हे जर सांगता येत नसेल तर पर्वती मतदारसंघात भाकरी फिरविण्याची हीच खरी योग्य वेळ आहे असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
    
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना , पीपल्स रिपब्लिकन पार्टी ( कवाडे गट), मनसे मित्रपक्ष महाआघाडी उमेदवार नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ बिबवेवाडी इंदिरानगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महाआघाडीच्या उमेदवार अश्विन कदम, अंकुश काकडे, अभय छाजेड, सचिन तावरे, बंडू नलावडे, सतीश पवार, सागर आल्हाट, विक्रांत अमराळे, राहुल गवळी, सनी खरात, अभिजित टेभेकर, सुनील बिबवे, मृणाली वाणी, शकुंतला कुंभार, दिलीप अरूंदेकर, दादा सांगळे, सचिन पासलकर, नितीन कदम तसेच महाआघाडी व मित्र पक्षाचे सर्व नगरसेवक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

यापुढे खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले ," सत्ताधारी भाजपा रडीचा डाव खेळत आहे. देशांमध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरू असून या निवडणुकीमध्ये देशाचे मुद्दे मतदारांच्या पुढे करून भावनिक राजकारण  केले जात आहे.राज्याचे मुख्यमंत्री समोर पैलवान नाही आणि कुणाचेही आव्हान नसल्याचे सांगून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत . महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षातील केलेल्या कामाचा आलेख जनतेपुढे मांडावा, मॅग्नेटिक महाराष्ट्राचे काय झाले ? मेक इन महाराष्ट्राचं काय झाले ? किती महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळाला ? या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावीत. तसेच पुणे शहराने सत्ताधारी भाजपाला आठ आमदार दिले.तरीही पुण्याची मेट्रो नागपूरला जाते.370 कलम पुढे करून देशाच्या मुद्द्यावर राज्याची निवडणूक लढविली जात आहे. परंतु 370 कलम रद्द झाल्यामुळे पुणे शहराची वाहतूक कोंडी कमी होणार नाही'' अशी टीका सत्ताधाऱ्यांच्या विरोधात खासदार अमोल कोल्हे यांनी केली. 

पर्वतीमध्ये नगरसेविका आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून अश्विनी नितीन कदम यांनी पुणे शहरात केलेले काम कौतुकास्पद आहे. आता भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे म्हणून जनतेने मोठ्या मत्ताधिक्याने माझी बहिण अश्विनी कदम यांना निवडून द्यावे असे आवाहन केले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे विचार ऐकण्यासाठी महिला आणि युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Amol Kolhe support Ashwini Kadam for maharashtra Vidhansabha 2019