सारथी जिवंत ठेवणे महाविकास आघाडी व शरद पवारांची जबाबदारी : छत्रपती संभाजी राजे

MP Chhatrapati Sambhaji Raje's visit to movement on front of Sarathi Office in Pune
MP Chhatrapati Sambhaji Raje's visit to movement on front of Sarathi Office in Pune
Updated on

विश्रांतवाडी (पुणे) आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे त्यांना त्यानिमित्ताने अभिष्टचिंतन करतो. शरद पवार हे शाहू महाराजांच्या विचाराचे पाईक आहेत. शाहू महाराजांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर  शरद पवार यांनी सारथी संस्था जिवंत ठेवणे आवश्यक आहे. लवकरच शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन शेवटची विनंती करणार असल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर तारादूतांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला छत्रपती संभाजी राजे यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
सारथी संस्था ही छत्रपती शाहू महाराजांचे जिवंत स्मारक असून, ते वाचवण्याची जबाबदारी ही महाविकास आघाडी सरकारची आहे. ते पुढे म्हणाले, एका बाजूला सरकारने सारथी संस्थेला स्वायत्तता असल्याचे सांगत असून कलम 25 नुसार संचालक आम्हाला काहीच अधिकार नाहीत, सरकार निर्णय घेईल असे सांगत आहे. यावरून अद्यापही या संस्थेला स्वायत्तता दिलेली नाही. सारथी संस्था जिवंत राहणे गरजेचे असून तारदूतांचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत. अन्यथा पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा मही छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी दिला.

एकीकडे शासन सारथी संस्थेला स्वायत्तता असलेले सांगत असले तरी दुसर्या बाजूला सारथी संस्था तारादूतांचा प्रस्ताव मान्य करण्याचे अधिकार नसल्याचे सांगून विषय टाळत आहे व छत्रपती संभाजीराजे सारथी संस्थेला भेट देण्याचे माहिती असूनदेखील संस्थेचे अध्यक्ष व संचालक उपस्थित नसणे ही संस्थेची बाब चुकीची आहे. असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी सांगितले. 
 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com