खासदार डॉ.अमोल कोल्हे घेणार पुणे विद्यापीठात अ‍ॅडमिशन

खासदार डॉ.अमोल कोल्हे घेणार पुणे विद्यापीठात अ‍ॅडमिशन

पुणे : अभिनेते आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारणारे डॉ.कोल्हे यांनी छत्रपतींविषयी अधिक जाणून घेण्यासाठी या डिप्लोमा कोर्सला प्रवेश घ्यायचे निश्चित केले आहे.

शुक्रवारी दुपारी त्यांनी विद्यापीठात जाऊन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस. उमराणी यांची भेट घेतली. अभ्यासक्रमाचा तपशील आणि इतर माहिती त्यांनी जाणून घेतली.

खासदार डॉ.अमोल कोल्हे घेणार पुणे विद्यापीठात अ‍ॅडमिशन
सुप्रियाताई, दादांच्या मताशी सहमत नाहीत का? पुणे महापौरांचा सवाल

यावेळी डॉ.कोल्हे म्हणाले ,"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोस्ट गॅज्युएशनचा अभ्यासक्रम हे स्तुत्य पाऊल वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास वाढायला हवा. अनेक तरुणांना महाराजांना जाणून घेता येईल. महाराजांना आणखी जाणून मला ही घ्यायचंय. अर्थव्यवस्था, व्यवस्थापन कौशल्य आणि इतर सर्व जाणून घ्यायचायं. त्यासाठी हा अभ्यासक्रम निश्चितच उपयोगी ठरेल. यासाठी मी स्वतः विद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊ इच्छितो आणि एक शिवप्रेमी म्हणून पाहिजे ती मदत मी करेल." कुलगुरू डॉ. करमळकर यांनी मराठा साम्राज्यावरील अध्यासन आणि अभ्यासक्रमाचा तपशील सांगितला. यावेळी डॉ. विजय खरे, डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते. एकूण 800 गुणांचा हा अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे.

खासदार डॉ.अमोल कोल्हे घेणार पुणे विद्यापीठात अ‍ॅडमिशन
'भाजप जाणीवपूर्वक त्रास देतेय; एजन्सीचा वापर विरोधकांवर दबावासाठी'

नुकतेच डॉ. कोल्हे यांनी केलेल्या फेसबुक पोस्ट मुळे चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज केल्याचे डॉ. खरे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, जगभरातील योद्धे आणि शिवाजी महाराज, युद्ध शैली, महाराजांची जन्मभूमी ते कर्मभूमि हा प्रवास आदींचा समावेश या अभ्यासक्रमात आहे. त्याचबरोबर एक डेजरटेशनही आहे. अभ्यासक्रमाला तंजावरचे शिवाजी महाराज यांचे मार्गदर्शन असून छत्रपती शिवाजी महाराजांवरील संशोधन नवीन तथ्ये बाहेर येण्यासाठी या अभ्यासक्रमाचा उपयोग होईल,असे डॉ. कळमकर यांनी सांगितले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com