esakal | गिरीश बापट यांची खासदार निधीतून एक कोटी ६५ लाखांची मदत

बोलून बातमी शोधा

 खासदार गिरीश बापट
गिरीश बापट यांची खासदार निधीतून एक कोटी ६५ लाखांची मदत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी एक कोटी पासष्ट लाख रुपयांची मदत गुरुवारी जाहीर केली. ही मदत त्यांच्या खासदार निधीतून दिली जाणार असून, त्यातून पुण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स व रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहे.

हेही वाचा: पहिला डोस जोमात, दुसरा कोमात!

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स मशिन खरेदी करण्यासाठी बापट यांनी २५ लाख रुपये दिले आहेत. हा निधी उपलब्ध होण्यासाठी बापट यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना पत्र दिले. तसेच रुग्णवाहिकेची कमतरता पडू नये म्हणून दहा सामाजिक संस्थांना रुग्णवाहिका खरेदी करण्याकरिता एक कोटी चाळीस लाख

रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया व इतर आवश्यक बाबीची पूर्तता करून रुग्णांना ही मदत उपलब्ध होईल, असे बापट यांनी सांगितले.