"भाजपच्या नगरसेवकांनाच बापट यांनी जाब विचारावा' 

sanjay-balgude
sanjay-balgude

पुणे  "शहराला समान पाणीपुरवठा करणारे प्रकल्प मार्गी का लागत नाहीत, याचा जाब प्रशासनापेक्षा खासदार गिरीश बापट यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना विचारावा. त्या मागचे खरे कारण काय आहे, ते कळेल,' अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी खासदार बापट यांनी चिमटा काढला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी खासदार बापट यांनी महापालिकेत बैठक घेतली. त्यावरून बालगुडे यांनी पत्रक काढून बापट यांच्यावर टिका केली. समान पाणीपुरवठा योजना सुरू होऊन चार वर्ष पूर्ण झाली. परंतु या योजनेची कामे कोणी अडविली आहेत. प्रभागात ही योजना राबविण्यास कोण आणि कशासाठी ठेकेदारांना विरोध करीत आहे, हे पक्षातील नगरसेवकांना त्यांनी विचारावे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. शंभर नगरसेवक आहेत. तेवढ्या प्रभागात तरी हे काम आजपर्यंत पूर्ण का झाले नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही बालगुडे यांनी पत्रात म्हंटले आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com