खासदार बापट म्हणताहेत, पुण्यातील 'या' भागाला भामा आसखेडचे पाणी मिळवून देणार

girish bapat.jpg
girish bapat.jpg

विश्रांतवाडी (पुणे) : भामा आसखेडचे पाणी धानोरीसह वडगावशेरी मतदार संघाला लवकरच मिळवून देणार आहे. प्रसंगी आंदोलन करावे लागले तरी ते करणार आणि पाण्याची समस्या दूर करणार अशी ग्वाही खासदार गिरीश बापट यांनी दिली.

धानोरी येथील पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान,  यावेळी बोलताना बापट म्हणाले, धानोरीत पोस्ट ऑफिसचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, तो अखेर मार्गी लागला आहे. आता पाण्याचा प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल.

प्रास्ताविकात नगरसेवक अनिल टिंगरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासूनची पॊस्ट कार्यालयाचा प्रश्न खासदार बापट यांच्यामुळे दूर झाला आहे. यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यामुळे खासदार बापट यांचे धानोरीवासीयांतर्फे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमास नगरसेवक अनिल टिंगरे, नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका ऐश्वर्या जाधव, मोहनराव शिंदे, धनंजय जाधव, दिलीप डाळीमकर, डाक अधीक्षक मुकूंद बडवे, उपविभागीय निरीक्षक भूषण देशमुख, पोस्टमास्तर मधुकर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक रवींद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन राजीव कुलकर्णी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com