
पुणे : ‘पुण्यातील जीवन हलाखीचे झाले आहे. हडपसरला पोहोचण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळात माणूस मुंबईला पोहोचतो. विकास आराखड्यानुसार रस्ते विकसित होत नाहीत. रस्त्यांची दुर्दशा झाल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्यामुळे शहरातील राहणीमानाचा दर्जा खालावला आहे,’ अशा शब्दांत खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी महापालिकेतील प्रशासकराज कारभारावर ताशेरे ओढले.