
पुणे - 'आपल्या वाट्याला कोणतीही भूमिका येऊ द्या, ती योग्य पद्धतीने पार पाडा. आपण शरद पवार या संघर्ष योद्ध्याच्या तालमीत तयार झालेलो कार्यकर्ते आहोत, त्यामुळे धीर धरा आणि संघर्ष करायला शिका' अशा शब्दात अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी आपल्या खास ग्रामीण भाषेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.