

MP Nilesh Lanke admitted hospital pune ruby hall clinic
esakal
Nilesh Lanke Health Pune : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलवण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.