देओल कुटुंबियाविरोधात पुण्यातील भाजप नेत्यावर आली न्यायालयात जाण्याची वेळ

अमोल कविटकर
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, खासदार हेमा मालिनी आणि खासदार सनी देओल यांच्यासह कुटूंबियांविरोधात न्यायालयाच्या दारात जाण्याची वेळ भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्यावर आली आहे

पुणे : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, खासदार हेमा मालिनी आणि खासदार सनी देओल यांच्यासह कुटूंबियांविरोधात न्यायालयाच्या दारात जाण्याची वेळ भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्यावर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

३१ मे रोजी देओल कुटूंबियांसोबत लोणावळा येथील १८५ एकर जागेच्या विकासासाठी काकडे यांनी करार केला होता. जागेच्या १०० एकरात जे डब्लू मॅरीएट या प्रसिद्ध हॉटेल कंपनीचं रिसॉर्ट आणि उरलेल्या ८५ एकरात निवासी संकुल करण्याचा करार करण्यात आल्याचा खासदार काकडे यांचा दावा आहे.

अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज

सामंजस्य करार झाल्यानंतर अठरा महिन्यांच्या कालावधीत अनेक बैठका झाल्या मात्र करारापेक्षा वेगळ्या मागण्या देओल कुटुबीयांनी केल्याचा दावा करत सामंजस्य करार पूर्णत्वाकडे नेण्यास टाळाटाळ केल्याचाही काकडे यांचा आरोप आहे. याप्रकरणी आज (ता.३१) दावा दाखल केल्यानंतर पुढील सुनावणी येत्या १० जानेवारीला पुण्याच्या न्यायालयात होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sanjay kakade go to court against the Deol family