श्रीनिवास पाटील यांच्या लोकसभेतील उपस्थितीबाबत महत्त्वाचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

16 मार्च रोजी महाराष्ट्रातील पर्यटनातील संधी, या विषयावर चर्चेत भाग घेतला. माजी सैनिकांची संख्या जास्त असल्यामुळे साताऱयात केंद्रीय विद्यालय हवे, अशी मागणी त्यांनी 17 मार्च रोजी केली होती. 20 मार्च रोजी सिंचनावर झालेल्या चर्चेत उतारावरून पाणी आणण्यात आले तर, गळती थांबेल, अशा आशयाचे मुद्दे त्यांनी मांडले होते.

पुणे : लोकसभेत पोहचल्यापासून सभागृहात 80 टक्क्यांपेक्षा जास्त काळ उपस्थित आहे. तसेच विविध प्रकारच्या विषयांवरील चर्चेतही सहभाग घेतलेला आहे. त्याची अधिकृत नोंदही उपलब्ध आहे. या बाबत परिवर्तनने तयार केलेल्या अहवालात चुकीची माहिती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱयाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातर्फे मंगळवारी करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

परिवर्तन संस्थेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या खासदारांच्या रिपोर्ट कार्डमध्ये श्रीनिवास पाटील यांनी सभागृहातील चर्चेत अदयाप सहभाग घेतलेला नाही, असे म्हटले होते. त्याचा खुलासा करताना खासदार पाटील यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आले की, , मुळात पोटनिवडणुकीतून पाटील निवडून आले आहेत. त्यांनी खासदारपदाची शपथ 18 नोव्हेंबर 2019 रोजी घेतली आहे. त्यानंतर लोकसभेची फक्त दोनच सत्रे झाली आहेत. 9 डिसेंबर 2019 रोजी आर्म्स बिलवर पक्षातर्फे त्यांनी भूमिका मांडली. त्यात महिलांनाही स्वसंरक्षणार्थ बंदूक अथवा पिस्तुलचे लायसन मिळावे, अशी मागणी केली होती.

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

16 मार्च रोजी महाराष्ट्रातील पर्यटनातील संधी, या विषयावर चर्चेत भाग घेतला. माजी सैनिकांची संख्या जास्त असल्यामुळे साताऱयात केंद्रीय विद्यालय हवे, अशी मागणी त्यांनी 17 मार्च रोजी केली होती. 20 मार्च रोजी सिंचनावर झालेल्या चर्चेत उतारावरून पाणी आणण्यात आले तर, गळती थांबेल, अशा आशयाचे मुद्दे त्यांनी मांडले होते. त्यानंतर लोकसभेचे सत्र झालेले नाही. त्यामुळे परिवर्तनने आपली माहिती तपासून पहावी, असेही पाटील यांच्या कार्यालयातर्फे म्हटले आहे. 

पुरंदर तालुका 30 वर; पुन्हा मुंबई - पुणे कनेक्शनमधूनच धोका वाढतोय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Srinivas Patil attendance is 80 per cent since he reached the Lok Sabha