सरसकट पंचनामे करण्याचे खासदार सुळेंचे आदेश; शिवगंगा खोऱ्यात पाहणी दौरा

महेंद्र शिंदे
Sunday, 18 October 2020

पावसाने शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत," असे खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी सांगितले.

खेड-शिवापूर : पावसाने शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत," असे खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवगंगा खोऱ्यात पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची सुळे यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हा परिषद सदस्या पूजा पारगे, काका चव्हाण, नवनाथ पारगे, शुक्राचार्य वांजळे, त्रिंबक मोकाशी, अशोक गोगावले, अभयसिंह कोंडे, संदीप मुजुमले, नाना धोंडे, जितेंद्र कोंडे, अनंता कोंडे आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळी अकरा वाजता गोगलवाडी येथील रस्त्याच्या कामाचे तसेच पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमीपूजन सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर खेड-शिवापूर येथील पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. तसेच खेड-शिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा आढावा घेऊन सुळे यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका यांच्या कामाचे सुळे यांनी कौतुक केले.  त्यांनतर आर्वी येथे पावसाने झालेल्या पिकांच्या  नुकसानीची पाहणीही सुळे यांनी केली. तसेच कोंढणपूर रस्त्यावरील सागराची ताल येथील वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी करून या रस्त्याच्या संथ आणि निष्काळजीपणे सुरू असलेल्या कामाबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

'अंतिम'च्या परीक्षेची अडचणी पाठ सोडेनात; मराठीच्या पेपरमधून पर्यायच झाले गायब!​

पावसाने पिकांबरोबर शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतजमिनीच्या नुकसानीचेही पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली होती. याबाबत सुळे यांना विचारले असता "पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खेड-शिवापूर टोलसंदर्भात लवकरच बैठक- टोलनाका हटाव कृती समितीतर्फे फेब्रुवारीमध्ये खेड-शिवापूर टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात येणार होता.  मात्र अजूनही ती बैठक झालेली नाही. याबाबत सुळे यांना विचारले असता "कोरोनामुळे टोल संदर्भातील गडकरी यांच्यासोबतची बैठक होऊ शकली नाही. मात्र आता लवकरच पाठपुरावा करून ही बैठक आयोजित करण्यात येईल," असे सुळे यांनी यावेळी सांगितले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sule inspected the flood-hit area