'अंतिम'च्या परीक्षेची अडचणी पाठ सोडेनात; मराठीच्या पेपरमधून पर्यायच झाले गायब!

ब्रिजमोहन पाटील
Saturday, 17 October 2020

शुक्रवारी दुपारच्या सत्रात एम.ए. मराठीचा 'प्रसारमाध्यमे आणि मराठी साहित्य' या विषयाची परीक्षा ऑफलाइन आणि ऑनलाइन सुरू झाली. विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास सुरवात केल्यानंतर अनेक प्रश्‍नांचे उत्तराचे चार पयार्यांऐवजी दोनच पर्याय दिले आहेत हे समोर आले.

पुणे : एम.ए. मराठीच्या 'प्रसारमाध्यमे आणि मराठी साहित्य' या विषयाच्या परीक्षेत 40 ते 42 बहुपर्यायी प्रश्‍नातील (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) दोन पर्याय गायब असल्याचा प्रकार समोर आला आहे. या तांत्रिक चुकीमुळे शेकडो विद्यार्थ्यांनाचा जीव टांगणीला लागलेला असताना विद्यापीठाने याबाबत अजून स्पष्टता आणलेली नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 'एमसीक्‍यू'पद्धतीने ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा घेतल्या जात आहेत. यासाठी विद्यापीठाने खासगी एजन्सीची निवड केली आहे, पण पहिल्या दिवसापासून तांत्रिक अडचणी येत आहेत. परीक्षा सुरू होऊन पाच दिवस झाले तरी यात दुरुस्ती होऊ शकलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह संबंधित विषयांचे प्राध्यापक, महाविद्यालयेही चिंतेमध्ये आहेत.

झोमॅटोची 'आत्मनिर्भर' डिलिव्हरी गर्ल; नोकरी सोडून सुरू केलं फूड डिलिव्हरीचं काम!​

शुक्रवारी दुपारच्या सत्रात एम.ए. मराठीचा 'प्रसारमाध्यमे आणि मराठी साहित्य' या विषयाची परीक्षा ऑफलाइन आणि ऑनलाइन सुरू झाली. विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास सुरवात केल्यानंतर अनेक प्रश्‍नांचे उत्तराचे चार पयार्यांऐवजी दोनच पर्याय दिले आहेत हे समोर आले. विद्यार्थ्यांनी याबाबत महाविद्यालयांकडे तक्रार केली असता, त्यांनी याबाबत आम्हाला काही माहिती नाही असे सांगितले. पेपर सोडवला नाही, तर नापास होऊ या भीतीने अनेक विद्यार्थ्यांनी दोन पर्यायांपैकी उत्तर निवडून परीक्षा दिली आहे. याबाबत विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली असली तरी अद्याप विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा पुन्हा होणार की नाही याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही.

पुण्यात ऐन गर्दीच्या ठिकाणी थरार; शिवीगाळ केली म्हणून मित्रालाच चाकूने भोसकले​

मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे म्हणाल्या, ''परीक्षेसाठी प्रश्‍न व्यवस्थित काढून दिले होते. पण तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांना दोनच पर्याय दिसले. इतर विषयांच्या परीक्षा असल्याने त्याच्या पुर्नपरीक्षेबाबत निर्णय झाला नाही, पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही.''

बीए एलएलबीच्या परीक्षेला लागले तीन तास
शनिवारी सकाळी बीए एलएलबीचा सिव्हिल प्रोसिजरचा पेपर होता, विद्यार्थ्यांनी लॉगइन केले, पण त्यांना पेपर येत नव्हता. एका विद्यार्थ्याने हेल्पलाइनला फोन केला, तर आज पेपरच नाही असे सांगण्यात आले, दुसऱ्या विद्यार्थिनीही कॉल केला, तर तिचे नाव विचारून फोन कट केला. अनेकांनी इमेल पाठवले. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास हा पेपर ऑनलाइन झाला. तो पर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा होणार की नाही याची धाकधूक होती, असे डेक्कन जिमखाना परिसरातील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने सांगितले.

NEET Result 2020: 'नीट'मध्ये महाराष्ट्राचा नंबर खालून दुसरा; काय आहेत कारणे?​

पेपर सबमीट झाला 10 सेकंदात
शिवाजीनगर येथील एका महाविद्यालयातील एमएससीच्या विद्याथ्याने 'मॉलिक्‍युलर बायोलॉजी'चे 55 प्रश्‍न सोडवले, पण प्रॉब्लेम येत असल्याने हेल्पलाइनवर कॉल केला. त्यावेळी तेथून मोबाईलवर लॉगइन करण्यास सांगितले. मोबाईलवर लॉगइन करून नवा पेपर सोडवत असताना लॅपटॉपवरील तांत्रिक अडचण दूर होऊन अवघ्या 10 सेकंदात पेपर सबमीट झाला, त्यावर मी सोडविलेल्या प्रश्‍नांपैकी कमी संख्या होती. मोबाइलवरही पेपर देता आला नाही, त्यामुळे माझे नुकसान होईल. माझ्या इतर मित्रांनाही असाच प्रॉब्लेम आला आहे, असे त्यांने सांगितले.

शनिवारी झालेल्या परीक्षेची आकडेवारी
ऑनलाइनसाठी अपेक्षित -9072
परीक्षा देणारे - 7268
ऑफलाइनसाठी अपेक्षित - 4368
परीक्षा देणारे - 3502

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MA Marathi Students of Pune University complained about many mistakes in question papers