Baramati News : बारामतीत सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांची झाली भेट...

खासदार सुप्रिया सुळे व बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची आज बारामतीत अचानक भेट झाली.
Supriya Sule and Sunetra Pawar
Supriya Sule and Sunetra Pawarsakal

बारामती - खासदार सुप्रिया सुळे व बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची आज बारामतीत अचानक भेट झाली.

या भेटीदरम्यान दोघींनी गळा भेट घेत सुहास्य वदनाने एकमेकिंचे स्वागत केले. बारामती मधील जळोची येथे महाकालेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी संयोजकांनी सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांना निमंत्रित केले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास प्रथम सुनेत्रा पवार त्या ठिकाणी आल्या व त्या पाठोपाठ सुप्रिया सुळे तेथे येऊन पोहोचल्या. दोघींनी एकमेकांना पाहताच गळाभेट घेत हसून स्वागत केले.

सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांनी एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्या दोघी आपल्या पुढील कार्यक्रमासाठी तेथून निघाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com