esakal | Viral Video : खासदार सुप्रिया सुळेंनी थांबवला गाड्यांचा ताफा; शेतकऱ्यांकडून स्वत: केली भाजी खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

MP_Supriya_Sule

यावेळी स्थानिक भागात आणखी कोणकोणत्या पिकांचं उत्पादन घेतलं जात आहे, याचीही त्यांनी यावेळी चौकशी केली.

Viral Video : खासदार सुप्रिया सुळेंनी थांबवला गाड्यांचा ताफा; शेतकऱ्यांकडून स्वत: केली भाजी खरेदी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सोशल मीडियावर कमालीच्या सक्रिय असतात. खासदार असूनही पाय जमिनीवर असल्याची उदाहरणे त्यांनी अनेकवेळा आपल्या कृतीतून दाखवून दिली आहेत.

सुप्रिया सुळे यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे माजी केंद्रीय कृषिमंत्री राहिले आहेत. त्यांच्याप्रमाणेच शेतकऱ्यांशी असलेली नाळ खासदार सुळे यांनीदेखील जोडली आहे. आताही त्यांचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. 

VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​

आपल्या मतदारसंघात फेरफटका मारत असताना कापूरहोळजवळ खासदार सुळे एके ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी थांबल्या. शेतातील ताजी भाजी आणि अंजीर, पेरू यांसारखी फळे खरेदी करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्यांनी स्वत: गाडीतून उतरत ही खरेदी केली. यावेळी स्वत:चा शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकरी महिला, मुली आणि इतरांशीही त्यांनी यावेळी संवाद साधला. त्यांच्याशी फोटोसेशनही केले. 

गव्यानंतर आता पुण्यात आले सांबर; 4 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर नैसर्गिक अधिवासात​

कापूरहोळमधील पेरू, अंजीर, पपई आणि भाजीची त्यांनी खरेदी केली. यावेळी स्थानिक भागात आणखी कोणकोणत्या पिकांचं उत्पादन घेतलं जात आहे, याचीही त्यांनी यावेळी चौकशी केली. त्यांनी अचानक दिलेल्या भेटीने शेतकरी आनंदी झाल्याचे यावेळी दिसून आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image