esakal | VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती
sakal

बोलून बातमी शोधा

VSSC Recruitment 2021 Apply Online 80 Job Vacancies

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ४ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करावेत.​

VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

ISRO -Vikram Sarabhai Space Centre (VSSC) Recruitment Notification 2021: भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) च्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (व्हीएसएससी) वैज्ञानिक / अभियंता आणि वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ४ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करावेत.

विक्रम साराभाई स्पेस सेंटरने तिरुअनंतपुरममध्ये वरील तीनही पदांसाठी नोकऱ्या जाहीर केल्या आहेत. बी.टेक, बी.ई, एम.एस्सी, एम.ई किंवा एम.टेक, एम.फील किंवा पीएच.डी आणि इतर समकक्ष अभ्यासक्रमातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. या पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा, रिक्त पद, पगार, शैक्षणिक पात्रता आणि तपशील याबाबतची माहिती पुढे दिली आहे. 

Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ४ जानेवारी २०२१  
काम करण्याचे स्थळ - तिरुअनंतपुरम
संस्था - विक्रम साराभाई स्पेस सेंटर
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी, डॉक्टरेट

वैज्ञानिक/अभियंता एस.डी : १९ पोस्ट
वैज्ञानिक/अभियंता एस.सी : ५९ पोस्ट
वैद्यकीय अधिकारी एसडी : १ पोस्ट
वैद्यकीय अधिकारी अनुसूचित जाती : १ पोस्ट

फी - खुला, ओबीसी - २५० रुपये

एस.सी, एस.टी, पीडब्ल्यूडी आणि महिलांसाठी फी नाही.

Govt Jobs: महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात भरती​

अर्ज कसा करावा :
इच्छुक आणि पात्र उमेदवार इस्रो- विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) च्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती व्यवस्थित पाहण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात येत आहे. 

अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शुद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image