पुणे - महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील मिळकतकराचा विषय महत्त्वाचा आहे. निवडणुकीच्या आधी एक न्याय आणि आता निवडणूक झाल्यानंतर वेगळा न्याय लावला जात आहे. या भागात कसल्याही सुविधा दिल्या जात नसताना कर कसला गोळा करता असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.