खासदार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर दौरा

डॉ. संदेश शहा
बुधवार, 27 जून 2018

इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना जनतेस दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्याने त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे  जनता आगामी निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही. असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. कळाशी, गंगावळण ( ता. इंदापूर ) येथील काळभैरवनाथ मंदिरात खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांशी संवाद साधला. खासदार, आमदार तसेच जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम विभागाच्या मार्फत झालेली विकासकामे, प्रलंबित विकासकामासंदर्भात त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.

इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना जनतेस दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्याने त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे  जनता आगामी निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही. असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. कळाशी, गंगावळण ( ता. इंदापूर ) येथील काळभैरवनाथ मंदिरात खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांशी संवाद साधला. खासदार, आमदार तसेच जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम विभागाच्या मार्फत झालेली विकासकामे, प्रलंबित विकासकामासंदर्भात त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील यांच्याकडून त्यांनी गंगावळण पर्यटन केंद्रासंदर्भातील सध्यस्थितीची माहिती घेतली.

खासदार सुळे पुढे म्हणाल्या, माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून आपण अन्नदात्या बळीराजास ७१ हजार कोटी रूपयांची संपुर्ण कर्जमाफी दिली होती. ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत आले, त्या त्या वेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे मदत केली. त्यामुळे आजही देशभरातील शेतकरी त्यांच्याशी  अडचणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी येतात. पंतप्रधान, मुख्यमंत्री महोदयांशी शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शरद पवार यांनी चर्चा केली. मात्र, हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय रहाणार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारविविध पॅकेज वेळोवेळी जाहिर केले. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नसल्याने कर्जमाफी फसवी आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यास भरघोस निधी मिळून परिवर्तन झाले. त्याची जनता आजदेखील मुक्तकंठाने चर्चा करते. 
यावेळी वैष्णवी देवकर या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती सभापती प्रविण माने, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव इजगुडे, महिला तालुकाध्यक्ष रेहाना मुलाणी, किसनराव जावळे, वीज वितरण कंपनीचे तालुका अभियंता रघुनाथ गोफणे उपस्थित होते. प्रास्ताविक 
महारूद्र पाटील तर सुत्रसंचलन राजेंद्र गोलांडे यांनी केले. 

इंदापूरचे मतदार प्रामाणिक आहेत
ज्यांनी कामे केली, त्यांनाच त्यांनी मते दिली. फेकू मोदी यांच्या आश्वासनास ते बळी पडले नाहीत. मतदारांची देखील आम्ही विश्वस्त वृत्तीने कामे केली. त्यामुळेमतदार सुखी तर आमदार, खासदार सुखी असे वक्तव्य खासदार सुळे यांनी करताच उपस्थितांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule visits Indapur