खासदार सुप्रिया सुळे यांना पाहा कसली लागली हुरहूर...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी चौंडीला जाता आले नाही, याची मनाला हुरहूर लागल्याची काहीशी भावनिक पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकली

बारामती : लॉकडाऊनमुळे यंदा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी चौंडीला जाता आले नाही, याची मनाला हुरहूर लागल्याची काहीशी भावनिक पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे चौंडीला न चुकता जात असतात. यंदा कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने त्यांना चौंडीला जाणे शक्य झाले नाही. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पोस्ट टाकली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुशल सेनानी आणि प्रजेच्या सुखदुःखात सतत त्यांच्याबरोबर असलेल्या आदर्श राजकर्त्या असलेल्या अहिल्याबाई होळकर कायमच आपल्यासाठी वंदनीय आणि प्रेरणास्रोत आहेत, असे सांगत, सुळे म्हणतात, 'रयतेसाठी दैवत असलेल्या या मातेला अभिवादन करण्याचे यावर्षी राहून गेले. ही हुरहूर कधीही विसरता येणार नाही. कोरोनासारख्या सांसर्गिक विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आज केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देश संकटात आहे.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा चोंडी येथे जाऊन अहिल्याबाईंच्या पवित्र स्मृतींसमोर नतमस्तक होता येत नाही. जनतेची गाऱ्हाणी ऐकून त्यांची तात्काळ तड लावण्याचे अद्भुत कसब अहिल्याबाई यांच्याकडे होते.  केवळ राज्यकर्त्याच नाही तर त्या एक कुशल सेनानी आणि न्यायप्रिय दैवत होत्या. त्यांच्या या असंख्य गुणांची आज आपण आठवण करुयात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule was upset that she did not go to greet Rajmata Ahilyadevi Holkar