गिरीश बापट, 55 दिवसांपासून कोठे होतात? खासदार वंदना चव्हाण यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

खासदार बापट, भाजपचे शहराध्यक्ष पालकमंत्री अजित पवार यांच्यावर नुकतीच टिका केली आहे. तसेच त्यांच्या पक्षातील इतर पदाधिकारी देखील बेजबाबदार विधाने करीत आहेत. त्यामुळे या आपत्तीतही भाजपाला नागरिकांच्या आरोग्यापेक्षा राजकारणात अधिक रस असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक महापौर मुरलीधर मोहोळ हे स्वत:च महापालिका आयुक्तांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करीत होते तर दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षाचे इतर पदाधिकारी व महापालिकेतील गटनेते यांना न जुमानता श्रेय केवळ स्वत:ला लाटण्यासाठीच अधिक धडपड करत होते.

पुणे : ''कोरोनाचे संकट गेल्या दोन महिन्यांपासून घोंघावत असताना गेल्या 55 दिवसांपासून भाजपचे खासदार गिरीश बापट कोठे होते, असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण कसबा, कॅंन्टोंनमेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात आहेत, परंतु तेथील निष्क्रीय आमदारही गायब झाले आहेत, '' असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
  क्लिक करा

खासदार बापट, भाजपचे शहराध्यक्ष पालकमंत्री अजित पवार यांच्यावर नुकतीच टिका केली आहे. तसेच त्यांच्या पक्षातील इतर पदाधिकारी देखील बेजबाबदार विधाने करीत आहेत. त्यामुळे या आपत्तीतही भाजपाला नागरिकांच्या आरोग्यापेक्षा राजकारणात अधिक रस असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक महापौर मुरलीधर मोहोळ हे स्वत:च महापालिका आयुक्तांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करीत होते तर दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षाचे इतर पदाधिकारी व महापालिकेतील गटनेते यांना न जुमानता श्रेय केवळ स्वत:ला लाटण्यासाठीच अधिक धडपड करत होते. मग अचानक असे नेमके काय झाले की, बापट यांना महापालिकेत येण्याची उपरती झाली,  राजकारण करण्याची ही वेळ नाही, याचे तरी भान ठेवा, असाही टोला चव्हाण यांनी बापट यांना मारला आहे. महापालिकेत कारभार करता येत नाही म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱयांनीही भाजपच्या नगरसेवकांची खरडपट्टी केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.  

- विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन महिन्यांत पुण्यात सात बैठका घेतल्या. महापालिकेला मदतीसाठी चार आयएएस अधिकारी नेमले. कोरोनासाठी वैद्यकीय साधने, उपकरणांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. ससून हॉस्पिटलला अतिरिक्त ५५ कोटी रूपयांचा निधी
देवून तिथे तातडीने कोव्हिड हॉस्पिटल उभे केले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गेल्या काही दिवसांत शहराचा तीन वेळा दौरा करून ससून हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटलची पाहणी करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांची बैठक घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही शहराचा दौरा करून पोलिसांचे मनोबळ वाढविण्याची कामगिरी बजावली आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Vandana Chavan put allegations on Girish Bapat