

Significant Discrepancy Found in Noise Level Records of MPCB and COEP During Ganeshotsav
esakal
प्रज्वल रामटेके
पुणे : गणेशोत्सवातील ध्वनीपातळीच्या नोंदींमध्ये ‘सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या (एमपीसीबी) अहवालात मोठी तफावत आढळली आहे. ‘सीओईपी’च्या पाहणीनुसार विसर्जन मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रस्त्यावरील दहा प्रमुख चौकांची सरासरी ध्वनीपातळी १०४.५ डेसिबल होती. त्याच वेळी एमपीसीबीच्या पाहणीत विसर्जनाच्या दिवशी प्रमुख चौकांमधील दिवसाची सरासरी ध्वनीपातळी ६९.९ ते ७५.४ डेसिबल नोंदली गेली. दोन्ही संस्थांच्या मोजणीची पद्धत आणि स्वरूप वेगवेगळे असल्याने हा फरक दिसून आल्याचे ‘एमपीसीबी’ने स्पष्ट केले आहे.