MPDC Crime : 'एमपीडीए' कारवाईत पोलिस आयुक्तांचे 'अर्धशतक'

पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) आणि 'एमपीडीए' कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे.
crime
crimeesakal

पुणे - शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) आणि 'एमपीडीए' कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गेल्या दहा महिन्यांत 'एमपीडीए' कायद्यांतर्गत ५० सराईत गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध करत 'अर्धशतकी' कारवाई केली आहे.

हडपसर परिसरात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगार अजय साळुंखे याच्याविरुद्ध 'एमपीडीए' कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. 'एमपीडीए' कायद्यांतर्गत ही ५० वी कारवाई आहे.

अजय विजय साळुंखे (वय-२१, रा. औदुंबर पार्क, मांजरी) हडपसर पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारासह चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी, खंडणी, गंभीर दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे सहा गुन्हे केले आहेत.

त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. या संदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शनिवारी आरोपी साळुंखेविरुध्द 'एमपीडीए' कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्दतेचा आदेश पारित केला.

रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यांनी १० महिन्यांच्या कालावधीत ५० सराईत गुन्हेगारांना 'एमपीडीए' कायद्यांतर्गत राज्यातील विविध कारागृहांमध्ये स्थानबध्द केले आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाकडून प्रथमच इतक्या कमी कालावधीमध्ये अशा स्वरुपाची प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली 'मोका' व 'एमपीडीए' सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलिस उपनिरीक्षक राजू बहिरट, सहायक उपनिरीक्षक शेखर कोळी, पोलिस अंमलदार योगेश घाटगे, संतोष कुचेकर, अविनाश सावंत, सागर बाबरे, अनिल भोंग तसेच विविध पोलिस ठाण्यांतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस अंमलदार यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com