
पुणे : मतदारसंघात सुरू असलेल्या कामांबाबत रेल्वे अधिकारी कोणतीच माहिती देत नाहीत, कामाच्या पाहणीसाठी अधिकारी लोकप्रतिनिधींबरोबर येत नाही, कोणत्याच प्रकारचे संपर्क ठेवत नाही, अशा अनुभवावरून संतापलेल्या खासदारांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसमोरच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाणउतारा केला. त्यामुळे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्यावर सारवासारव करण्याची वेळ आली.