MPSC Exam Postponed
esakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अखेर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान नियोजित असलेली ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असून, सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर आगामी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेबाबत उमेदवारांच्या मनात निर्माण झालेला संशय, तसेच परीक्षाप्रक्रियेबाबत उपस्थित झालेले प्रश्न यावर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला होता. त्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यमान प्रश्नपत्रिका रद्द करून त्या नव्याने तयार करण्यात येणार आहेत का, याबाबत आयोगाने अद्याप स्पष्टता दिलेली नाही.