पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील ‘दुय्यम निरीक्षक’ पदासाठी गट ‘क’ संवर्गातील १३७ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारांना यासाठी ३० जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.