

MPSC
sakal
पुणे : पारदर्शक आणि गतिमान प्रक्रियेचा दावा करणाऱ्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’चा (एमपीएससी) भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सहाय्यक नगररचनाकार (गट ब, श्रेणी १) या राजपत्रित पदाच्या चाळणी परीक्षेला तब्बल सहा महिने उलटून गेले आहेत, तरीही आयोगाला पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यास मुहूर्त सापडला नाही.