Darshana Pawar Death : दर्शना पवार प्रकरणी तो तरुण अद्यापही फरार..!

दोघांचेही फोन बंद असल्याच्या कारणाने दर्शनाच्या वडिलांनी सिंहगड रस्ता पुणे येथील पोलीस स्टेशनमध्ये दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार
mpsc darshana pawar death multiple injuries body murder police accused absconding
mpsc darshana pawar death multiple injuries body murder police accused abscondingSakal
Updated on

वेल्हे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून अधिकारी झालेली अहमदनगर जिल्ह्यातील तरुणी दर्शना पवार हिच्या मृत्यू प्रकरणा तिचा खून झाल्याचे समोर आले असले तरी तो तरुण अद्यापही फरार असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

दर्शना दत्ता पवार असे खून झालेल्या उच्चशिक्षित मुलीचे नाव असून तिच्या पुण्यातून बेपत्ता झाल्यापासून ते किल्ले राजगडच्या पायथ्याशी सडलेल्या अवस्थेत आढळलेला मृत्यू मृतदेह यामध्ये जवळपास सहा ते आठ दिवसांचे अंतर असल्याचे दिसून येत आहे. दर्शना ही ९ जून रोजी सत्कारासाठी पुण्यात दाखल झाली होती.

१० जून सायंकाळी चार वाजेपर्यंत ती घरच्यांच्या संपर्कात होती. त्यानंतर दर्शनाने घरातील व्यक्तींचे फोन स्वीकारले नाहीत. दरम्यान दर्शनाचे वडील दत्ता दिनकर पवार हे पुण्यात येऊन अकॅडमीत चौकशी केली असता तसेच पुण्यात आल्यानंतर ज्या मैत्रिणीकडे राहिली होती त्या मैत्रिणी कडे चौकशी केली असता ती राहुल दत्तात्रेय हंडोरे नामक युवकाच्या बरोबर सिंहगड व राजगड किल्ला फिरायला गेल्याचे कळले.

दोघांचेही फोन बंद असल्याच्या कारणाने दर्शनाच्या वडिलांनी सिंहगड रस्ता पुणे येथील पोलीस स्टेशनमध्ये दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार दिनांक १५ जून रोजी दाखल केली . दरम्यान मुलीचे वडील व नातेवाईक हे किल्ले राजगडच्या पायथ्याशी गुंजवणे येथे येऊन परस्पर चौकशी करून गेले परंतु त्यांनी वेल्हे पोलीस स्टेशनची संपर्क केला नसल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

mpsc darshana pawar death multiple injuries body murder police accused absconding
Darshana Pawar : MPSC परीक्षेतील यशानंतर सत्कारासाठी दर्शना पुण्यात आली अन्…; अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितला घटनाक्रम

दरम्यान १८ जून रोजी दर्शनाचा मृतदेह किल्ले राजगड च्या पायथ्याशी सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वेल्हे पोलिसांकडून दर्शनाच्या वडिलांची संपर्क साधून घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सापडलेला मोबाईल, बूट ,गॉगल ,पर्स ,ओढणी, या वस्तू दर्शनाच्या, व जॅकेट व बॅग राहुलच्या असल्याचे वडिलांनी ओळखल्यानंतर सदर मृतदेह हा दर्शनाचा असल्याचे सिद्ध झाले.

दरम्यान तिच्याबरोबर आलेला मुलगा राहुल हा त्या दिवसापासून फरारी असल्याने संशयाची सुई त्याच्याकडे वळली गेली. परंतु शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत नक्की कारण समजू शकले नव्हते. शवविच्छेदन अहवाला नंतर डोक्यावर व अंगावरील जखमा नंतर दर्शनाचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरुद्ध वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mpsc darshana pawar death multiple injuries body murder police accused absconding
Darshana Pawar Post mortem Report : MPSC पास झालेल्या दर्शना पवारच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण

दरम्यान या खुणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सखोल चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत परंतु दर्शना बरोबर आलेला मुलगा हा अद्यापही फरार असल्याने मोठे आव्हान पोलिसांच्या पुढे ठाकले आहे.

याबाबत सीसीटीव्ही फुटेज, तसेच अनेक साक्षीदारांच्या चौकशीनंतरही खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याचे दिसून येत आहे. तपासासाठी अनेक पथके शोध मोहीम करत असली तरी तो तरुण हाती लागल्याशिवाय खुणाचे कारण अद्याप समोर येणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com