...तर ‘पीपीई किट’ घालून ‘एमपीएससी’ परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mpsc exam 2021 ppe kit for covid symptom students

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेसाठी उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोगाने मानक कार्यप्रणाली (एसओपी) शुक्रवारी जाहीर केली आहे.

...तर ‘पीपीई किट’ घालून ‘एमपीएससी’ परीक्षा

पुणे : तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी (ता.२१) घेण्यात येणारी ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०’ देणार आहात का!, तर मग जरा इकडे लक्ष द्या! परीक्षेदरम्यान परीक्षार्थी उमेदवारांना ताप, सर्दी, खोकला, अशी कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येत असल्यास अशा उमेदवारांना पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या उमेदवारांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोगामार्फत देण्यात आली आहे. लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२०’ येत्या रविवारी (ता. २१) आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेसाठी उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोगाने मानक कार्यप्रणाली (एसओपी) शुक्रवारी जाहीर केली आहे. त्यानुसार परीक्षार्थी उमेदवारांना ताप, सर्दी, खोकला अशी कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास त्यांनी संबंधित परीक्षा उपक्रेंदावरील पर्यवेक्षकीय अधिकारी, कर्मचारी यांना आगाऊ कळवावे. अशा उमेदवारांना मास्क, हातमोजे, फेस शील्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप असलेले पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच अशा उमेदवारांची स्वतंत्र परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करण्यात येईल, असेही आयोगाने कार्यप्रणालीतील सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश करताना उमेदवारांना किमान तीन पदरी कापडाचा मास्क घालणे अनिवार्य असणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये मिळणार ‘मास्क’सह किट त्याशिवाय परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परीक्षार्थी उमेदवारांनी या किटचा वापर दोन्ही सत्राकरिता करणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता तसेच आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाइज करणे आवश्यक आहे, असे आयोगाचे सहसचिव सुनील औताडे यांनी सांगितले.

आणखी वाचा - पुण्याच्या तळजाई टेकडीचं रूप पालटणार!

आयोगामार्फत दिलेल्या मानक कार्यप्रणालीतील महत्त्वाचे मुद्दे

  • शारीरिक/परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तीपत्रिका यावरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
  • परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्रावर जाताना शारीरिक/ परस्पर अंतर राखणे अनिवार्य.
  • वापरलेले टिश्यू पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटाईज पाऊच, अशा वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीत टाकावेत.
  • कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य, तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
  • प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे.
loading image
go to top