तळजाई टेकडीचे रुप पालटणार! राज्याच्या वन विभागाकडून मिळणार भरघोस निधी

State approves 5 crore Fund Taljai Tekdi
State approves 5 crore Fund Taljai Tekdi

पुणे : पुणे जिल्ह्यातील वनांचा विकास आणि सामाजिक वनीकरणासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी ५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामाध्यमातून पुण्यातील तळजाई टेकडीचाही विकास होणार आहे. तळजाई टेकडीवर रोज व्यायामासाठी आणि फिरायाला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कात्रज, सहकारनगर, पद्मावती, धनकवडी, बालाजीनगर भागातील नागरिकांना तळजाई टेकडी अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर असल्याने नेहमीच येथे वर्दळ असते. दरम्यान तळाजाईवर येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी आणि तळजाईवरील वनसंपत्ती जपणूक करण्याची आवश्यकता आहे. तसेच येथील वन्यजीवाचे संरक्षण आणि संवर्धनाची आवश्यकता आहे. तळजाई टेकडी परिसरात दारुडे आणि चोरी, मारहाण सारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून त्याला आळा घालण्यासाठी देखील उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान तळजाई टेकडीवरील समस्या सोडविण्यासाठी आणि पुणे शहराजवळील पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी राज्याच्या वन विभागाकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सराकारने  निधी उपलब्ध करुन दिला असून तळजाई टेकडीचे रुप पालटणार आहे.

५५ कोटींचा निधीच्या माध्‍यमातून  मधील आगामी आर्थिक वर्षात (२०२१-२२) वनविकासाची विविध कामे केली जाणार आहेत. मंजूर कामे लवकरच सुरू केली जाणार असल्याचे  राज्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी गुरुवारी (ता.१८) सांगितले. चालू आर्थिक वर्षात (२०२०-२१) राज्याचा वन विभाग आणि जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध झालेल्या निधीतून सामाजिक वनीकरण व वन्यजीवन आदी विषयावरील विविध योजनांसाठी निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

भरणे म्हणाले, ‘‘या निधीच्या माध्‍यमातून ओसाड वन जमिनीवर वृक्ष लागवड करणे, संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राज्यातील वनक्षेत्रात वाढ करणे व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. यानुसार वनातील मार्ग व पूल आवश्यकतेनुसार दुरुस्त करणे, वनातील नवीन रस्ते तयार करणे, लहान पुलांची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत.’’

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी नवा उच्चांक; सर्वाधिक नवे रुग्ण आढळले हडपसर-मुंढव्यात

वनक्षेत्रामध्ये पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत नवीन रोपवाटिका तयार करणे, रोपवाटिकांचे बळकटीकरण करणे, रोपवाटिकेत जाण्यासाठी नवीन रस्ता करणे, सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे बळकटीकरण करणे, वनातील मृद व जलसंधारणाची कामे करणे, जमिनीची धूप थांबवून पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडविणे, भूगर्भातील पिण्याच्या पातळीत वाढ करणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे, मध्यवर्ती रोपमळे तयार करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. वनविभागामध्ये अस्तित्वात असलेल्या निवासस्थानांचे परिरक्षण व विशेष दुरुस्ती, ग्राम परिसर विकास, आदिवासी विकास कार्यक्रम, वनातील अशा एकूण ८ योजनांकरिता ४० कोटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.  इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ६ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तळजाई पर्यटन क्षेत्रासाठी ५ कोटींचा निधी

दरम्यान, राज्याच्या वन विभागाकडून पुणे शहराजवळील तळजाई पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून लवकरच तळजाई पर्यटन क्षेत्र विकासाची कामे हाती घेण्यात येणार असल्याचेही वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com