
MPSC Exam Fraud
Sakal
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाने आतापर्यंतची सर्वात कठोर भूमिका घेतली आहे. परीक्षांमध्ये गैरवर्तन केल्याबद्दल राज्यातील तब्बल ९० उमेदवारांना आयोगाने कायमस्वरूपी परीक्षा देण्यापासून प्रतिबंधित केले आहे. या उमेदवारांची काळी यादी आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून, या निर्णयामुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे शासकीय नोकरी मिळविण्याचे स्वप्न कायमचे संपुष्टात आले आहे.