

MPSC Investigation 2025 Nine Exams Under Scrutiny as Students Seek Clarity on State Services Main Exam Exclusion
esakal
-प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या आयोगाच्या कामकाजाला अखेर गती मिळाली आहे. आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंडे यांनी नऊ परीक्षांच्या चौकशीसाठी पुरावे सादर करण्याचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. मात्र, या नऊ परीक्षांच्या यादीत ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५’ चा समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, या परीक्षेच्या निकालातील गुणांच्या मूल्यमापनाबाबत विद्यार्थ्यांनी यापूर्वीच गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. त्यामुळे इतर परीक्षांची चौकशी होत असताना ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५’ला चौकशीच्या कक्षेबाहेर का ठेवण्यात आले, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.