टिळक चौकातील आंदोलन स्थगित

टिळक चौकातील आंदोलन स्थगित
Published on: 

पुणे, ता. ७ : ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) परीक्षांसाठी वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) पद्धत कायम ठेवण्याच्या मागणीसाठी टिळक चौकात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर बुधवारी (ता. ७) स्थगित करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि न्यायव्यवस्थेचा मान राखत हे आंदोलन मागे घेतल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.
‘एमपीएससी’ची परीक्षा वस्तुनिष्ठऐवजी (ऑब्जेक्टिव्ह) वर्णनात्मक पद्धतीनेच व्हावी, या मागणीसाठी गुरुवारी (ता. १) टिळक चौकात विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला होता. बुधवारी सलग सातव्या दिवशीही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते. मात्र, या संदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आंदोलकांनी भूमिका स्पष्ट करत आंदोलनाला तूर्त स्थगिती दिली.
याविषयी विद्यार्थी म्हणाले, ‘‘विद्यमान वर्णनात्मक परीक्षा धोरण कायम ठेवण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता आणि तो बऱ्याच अंशी साध्य झाला आहे. त्यामुळे कायद्याचा आणि न्यायालयाचा सन्मान राखत सध्या तरी हे आंदोलन थांबवले आहे. मात्र, भविष्यात जर वस्तुनिष्ठ परीक्षेबाबत सरकारने किंवा आयोगाने नव्याने काही निर्णय घेतल्यास, त्याबाबत पुन्हा स्वतंत्रपणे विचार करून पुढील दिशा ठरवली जाईल.’’

‘‘उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आदर करत आम्ही याचिका मागे घेतली आहे. विद्यार्थ्यांनी आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पारदर्शक परीक्षेचा अधिकार हा विद्यार्थ्यांचाच असल्याचेही न्यायालयीन चर्चेत नमूद झाले आहे. विशेष म्हणजे, वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा मुख्य मुद्दा या याचिकेत चर्चेला न आल्याने तो स्वतंत्रपणे कायम राहिला आहे.’’
- चेतन वागज, विद्यार्थी प्रतिनिधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com